राजा रघुवंशी हत्येमागेचं 'राज'; सोनम आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सचा खेळ उघड!

  50

मुंबई : हनी, हनिमून आणि हत्या, अंगावर काटा उभा करणारं थंड डोक्यानं आखलेलं षडयंत्र एक सुनियोजित कटासाठी सुनियोजित हनिमून...राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम रघुवंशीमध्ये नेमकं काय घडलं...हा हनिमून होता की क्रूर हत्येचं षडयंत्र? काय आहे ही थरारक कहाणी?


पत्नी सोनम रघुवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या पती राजा रघुवशींची प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने काटा काढण्याची योजना तिनं आखली. 20 मे 2025 रोजी इंदूरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह थाटामाटात पार पडला. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी मेघालयात गेलं. राजा रघुवंशी हनिमूनची स्वप्न रंगवत होता तर सोनम त्याचा काटा काढण्याच्या विचारात होती. ते दोघेही शिलाँगजवळील चेरापुंजीतील नोंग्रीट गावात डबलडेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी गेले. मात्र राजा रघुवंशी याला स्वप्नातही वाटलं नव्हतं हा त्याचा शेवट असेल. नवऱ्याबरोबर हसतखेळत असलेली सोनमने हनिमून नव्हे तर नवऱ्याच्या हत्येसाठा भयंकर योजना आखली होती.



शिलाँग पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचं षडयंत्र रचलं. राज कुशवाहा शिलाँगमध्ये नव्हता. मात्र फोनवरून तो कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या संपर्कात होता. राजाला संपवण्यासाठी त्यांनी तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सची मदत घेतली होती. आकाश, विशाल आणि आनंद हे तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्स चेरापुंजीत दाखल झाले. सोनमने जाणीवपूर्वक राजाला एका सूमसाम रस्त्यावर नेलं. तिथे या तिघांनी मिळून राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली. राजाचा काटा काढला. हत्येनंतर सोनम आणि हे तिन्ही किलर्स शिलाँगहून गुवाहाटीला पळाले. एक दिवस त्यांनी गुवाहाटीलाच काढला. त्यानंतर सर्व जण वेगवेगळ्या मार्गाने पसार झाले.


मात्र सोनम जिवंत असल्याची आणि राजा रघुवंशीच्या कटात तिचा हात असल्याची पोलिसांना शंका आली. सोनमच्या फोन कॉल डिटेल्समधून धक्कादायक खुलासा समोर आला. ती राज कुशवाहाशी सतत संपर्कात होती. दोघांचे प्रेमसंबंध होतं आणि राजा रघुवंशी हा त्यांच्या मार्गातला अडथळा होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि सनम बेवफा असलेल्या सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशावाह यांनी आखलेल्या हत्येचा पर्दाफाश केला. हत्येच्या 17 दिवसांनंतर, 2 जून 2025 रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह शिलाँगजवळ सापडला, मात्र बेवफा सोनम फरार होती.



पोलीस गप्प बसलेले नव्हते. त्यांनी तपासाची चक्रं फिरवून सर्वात आधी ललितपूर येथून आकाश राजपूतला बेड्या ठोकल्या. त्यानंतर इंदूरमधून विशाल आणि राज कुशवाहाला पकडलं. सोनम रघुवंशीने गाझीपूर येथील एका ढाब्यावर आत्मसमर्पण केलं. तर पाचवा आरोपी आनंदलाही अटक करण्यात आली. राजा रघुवंशी हत्याकांडात एकूण पाच जणांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आलंय.


आपलीच हनी, आपलाच हनिमून आणि आपलीच हत्या होईल असं राजा रघुवंशीच्या स्वप्नातही आलं नसेल.


हनिमूनसारख्या सुंदर स्वप्नाचा असा भयंकर अंत होईल, असंही कुणाला वाटलं नव्हतं. सोनम रघुवंशी, राज कुशवाहा आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्स यांनी मिळून रचलेला हा भयंकर कट देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. आता न्यायाची वाट पाहणाऱ्या राजा रघुवंशीच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का आणि प्रियकरासाठी बेवफा बनलेली सोनमला शिक्षा होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अंगावर काटा आणणारी थरारक कहाणी अजून संपलेली नाही. जर सनमचं राज कुशवाहावर एवढं प्रेम होतं तर निष्पाप राजा रघुवंशीचा जीव घ्यायची गरज नव्हती. राजा रघुवंशीला लग्नापूर्वीच कल्पना दिली असती तर एक जीव वाचला असता आणि थरारक हत्याकांड घडलं नसतं.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण