विद्यार्थ्यांना करिअर घडवताना कॉमर्समधून भरपूर ऑप्शन: दीपक गोंदकर

शिर्डी : १२ वी नंतर आपण काय करू शकतो हे सर्व विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात मोठे कन्फुझन असते, कि काय केले पाहिजे किंवा काय नाही केले पाहिजे.ते या 'घे भरारी... तू आकाशी' मार्गदर्शना शिबिरामुळे सोपे झाले आहे.खूप मुले,मुली सायन्सकडे वळतात, पन मला असं वाटते कि कॉमर्स मधून पण भरपूर ऑप्शन असतात.मात्र विद्यार्थ्यांनी खचून न जाता अशाप्रकारे मोफत मार्गदर्शन शिबिरातून करिअर बाबत मार्ग शोधावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष दिपक गोंदकर,निलेश शिंदे यांनी केले आहे.


दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट शिर्डी यांच्या वतीने रविवार दि .८ जून २०२५ रोजी हॉटेल विदिशा येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित घे भरारी ..तू आकाशी, स्वप्नांकडे वाटचाल या करिअर मार्गदर्शन विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर,बाबासाहेब गोंदकर, संग्राम कोते, निलेश कोते, अमित शेळके, निलेश शिंदे आदि मान्यवरांच्या शुभहस्ते साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी शिबिरासाठी इयत्ता ८ वि ते १२ वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यासह पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी दिपक गोंदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि,आजच्या या विशेष सत्रात अजिंक्य खंडीझोड सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.मी ते ऐकत होतो त्यावेळी याठिकाणी आलेले सर्वजण ग्रुप करून बसले होते. ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण मी अनेक ठिकाणी कार्यक्रमात बघतो कि फक्त एका साईडला जे बोलत असतात लोकांच लक्ष्यही नसते. आम्ही पण विद्यार्थी दशेत होतो.


आम्हाला माहित कि, कोण किती लक्ष्यपूर्वक ऐकत असतो, पण तुम्ही एक कम्युनिकेशन स्कील चा जो पार्ट तुम्ही घेतला तो खरच खूप छान असल्याचे सांगितले.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष निलेश शिंदे म्हणाले कि, आमच्या वेळेस या बाबतीत स्वतः मला कुणी मार्गदर्शन नव्हते केले,कि ग्रुप डिस्कशन आणि प्रेझेन्टेशन साठी आम्ही कधी कॉलेज गेलो नाही, याच महत्व ज्या वेळी शिक्षण पूर्ण झाले त्यावेळेस कळल्याचे त्यांनी म्हटले.


याप्रसंगी शिवाजी गोंदकर,अनिल कोते,सुशांत अवताडे,सचिन गोंदकर, साई कोतकर, अमोल सुपेकर, अजित जगताप,चंद्रभान बनकर, विशाल नागरगोजे,गंगाधर वाघ, निलेश सुरुडकर, अमोल गिरमे,युनूस सय्यद, राकेश भोकरे, राहुल फुंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांचे आभार मानले.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना