पनवेलमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट, 'घरजावई' बनलेत: छापासत्र थांबणार की वाढणार?

  146

पनवेल बांगलादेशींचा मोठा अड्डा! ३५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई


पनवेल : पनवेल पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांच्या मोठ्या अड्ड्यामुळे चर्चेत आहे. पनवेल शहर आणि तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असली तरी, हा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यापूर्वीही अनेकदा कारवाई करूनही हे नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चिखले गावातील एक बांगलादेशी नागरिक तर इतका निर्ढावलेला आहे की, पाच-सहा वर्षांपूर्वी कारवाई होऊनही तो आजही तिथेच 'घरजावई' बनून राहत आहे!



९ मे रोजी पनवेल तालुका पोलिसांना खेरणे परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत ११ पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.


त्याचबरोबर, पनवेल शहर पोलिसांना तक्का कातकरवाडी येथेही बांगलादेशी नागरिक असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तिथेही छापा टाकून ४ पुरुष, ३ महिला आणि ५ मुलांसह एकूण १२ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली.


या सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि त्यानंतरही बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या, हा पनवेलसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या