Tuesday, June 17, 2025

पनवेलमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट, 'घरजावई' बनलेत: छापासत्र थांबणार की वाढणार?

पनवेलमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट, 'घरजावई' बनलेत: छापासत्र थांबणार की वाढणार?

पनवेल बांगलादेशींचा मोठा अड्डा! ३५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई


पनवेल : पनवेल पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांच्या मोठ्या अड्ड्यामुळे चर्चेत आहे. पनवेल शहर आणि तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असली तरी, हा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यापूर्वीही अनेकदा कारवाई करूनही हे नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चिखले गावातील एक बांगलादेशी नागरिक तर इतका निर्ढावलेला आहे की, पाच-सहा वर्षांपूर्वी कारवाई होऊनही तो आजही तिथेच 'घरजावई' बनून राहत आहे!



९ मे रोजी पनवेल तालुका पोलिसांना खेरणे परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत ११ पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.


त्याचबरोबर, पनवेल शहर पोलिसांना तक्का कातकरवाडी येथेही बांगलादेशी नागरिक असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तिथेही छापा टाकून ४ पुरुष, ३ महिला आणि ५ मुलांसह एकूण १२ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली.


या सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि त्यानंतरही बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या, हा पनवेलसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा