मुंबईत खाडी किनारीच्या इमारतींना धोका

  56

मुंबई : मुंबईत खाडी किनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे रहिवाशांकडून बोलले जात आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बजेटमध्ये घर मिळत असल्यामुळे मुंबई उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी काही वर्षांपूर्वी कामोठे नोडमध्ये घरे विकत घेतली. येथील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हा खाडीकिनारपट्टीचा परिसर मागील १० ते १५ वर्षांत इमारतींनी गजबजून गेला आहे. हक्काचे घर घेतल्याचे समाधान कालांतराने भरतीच्या पाण्यामुळे ओसरू लागले आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी इमारतीवर सतत आदळत असल्याने पाया हळूहळू खचू लागला आहे. याची जास्त झळ येथे जाणवत आहे.



कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७२ सदनिका आणि १३ गाळे आहेत. १ मार्च २००७ मध्ये बांधकाम व्यावसायिकाने इमारत रहिवाशांना हस्तांतरित केली, त्या वेळी परिसरात सिडकोने ९० फूट रस्ता प्रस्तावित केला होता, मात्र कांदळवन संरक्षण कायद्यातील बदलामुळे रस्त्याचे नियोजन बारगळले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई