Share Market Morning News: शेअर बाजारात चढा ट्रेंड कायम! सेन्सेक्स ३३.८२ तर निफ्टी २९.७० अंशाने वधारला बाजारात ' हे' पाहणे महत्त्वाचे

प्रतिनिधी: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीत ०.६५ टक्क्याने वाढ झाल्यानंतर आज शेअर बाजार सुरू होताना सेन्सेक्स (Sensex) ३३.८२ अंशाने वधारत ८२४७९. ०७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी  ५० (Nifty 50) २९.७० अंशाने वाढून २५१३५.९० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४.३७ अंशाने वाढ होत ६३९९९.९९ पातळीवर तर बँक निफ्टीत मात्र ७३.८० अंशाने घसरण होत ५६७६२.२० पातळीवर पोहोचला आहे. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०७% व ०.२७% वाढ झाली आहे. एनएसई (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२८ व ०.१०% घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात बाजारात उसळी येईल असे संकेत मिळत असले तरी अजून सारे काही आलबेल नाही.

आज युएस चीन यांच्यातील व्यापार संबंधी अंतिम चर्चा होणार आहे. त्यांच्यातील अंतिम निष्कर्ष बाजाराला नवे वळण देऊ शकते. यामुळेच आशियाई शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळाले होते. निकेयी (Nikkei 225) १.००%, हेगंसेंग (Hang Seng) मध्ये ०.२५%, शांघाय (Shanghai) ०.११% वाढ झाली होती. आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) आज मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेले २-३ दिवसांपासून सोने, तेलाच्या निर्देशांकात चढउतार झाले आहे त्यामुळे त्यांचा संमिश्र अंदाज या आठवड्यांसाठी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. आज मात्र युएस बाजारात मागणीपेक्षा पुरवठ्यात घट झाल्याने तेलाचे भाव दिवसभरात वाढू शकतात. सकाळी WTI Crude Oil Futures या निर्देशांकात ०.२५ टक्क्याने वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांकात सकाळपर्यंत ०.८३ % घट झाली.

काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १९९३ कोटींची रोख गुंतवणूक केली आहे तर घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ने ३५०३.७९ कोटींची रोख गुंतवणूक केली होती. त्या धर्तीवर बाजारात आज मोठी उलाढाल दिसू शकते. जागतिक परिस्थिती नाजूक होत असताना भारतात मात्र अनुकूल परिस्थिती दिसल्याने परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करु शकतात. याशिवाय रेपो दर कपातीमुळे बाजारातील तरलता वाढली त्यामुळे खेळत्या भांडवलाचा फायदा घरगुती गुंतवणूकदारांना झाला आहे. मात्र चीन अमेरिका यांच्यातील चर्चा व भारत युके ट्रेड पॅटर्न यामुळे बाजारात वेगळे वळण मिळू शकते.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक फायदा जिंदाल सॉ (५.१५%), झी एंटरटेनमेंट (५.१२%), कोफोर्ज (४.७७%), हिंदुस्थान झिंक (३.९३%), रिलायन्स पॉवर (३.५९%), नेटवर्क १८ मिडिया (२.०९%), ग्रासीम इंडस्ट्रीज (३.४८%), इंडसइंड बँक (१.६०%), भारत इलेक्ट्रॉनिक (१.४७%), अल्ट्राटेक सिमेंट (१.२६%), वेदांता (१.३६%), टेक महिंद्रा (१.२५%) या समभागात वाढ झाली आहे.तर नुकसान कॅप्रिग्लोबल (३.६९%), इंडियन बँक (३.२%), जेएम फायनांशियल (२.९१%), आरबीएल बँक (२.०४%), चोलामंडलम फायनान्स (१.३१%), एव्हेन्यू  सुपरमार्ट (१.५८%),  इंटरग्लोब एव्हिएशन (१.२७%), आयसीआयसीआय बँक (१.००%), इटर्नल (०.८१%) या समभागात (Shares) मध्ये झाली आहे.

विशेषतः आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्यें मिडिया (२.०८%), मेटल (०.७३%), आयटी (१.३६%) या समभागात झाली आहे. तर नुकसान पीएसयु बँक (०.०४%), रिअल्टी (०.१६%), बँक (०.२१%) समभागात झाले आहे. चीन व अमेरिका यांच्यात आज सकारात्मक चर्चा होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे कारण काल युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेबाबत बोलताना 'चांगला अहवाल' अशी प्रतिक्रिया आज बाजारातील गुंतवणूकदार या घटनेकडे लक्ष केंद्रित करतील असा संकेत मिळत आहे. तज्ञांच्या मते आज निफ्टी हा नजीकच्या काळात २४५०० - २५५०० च्या श्रेणीत एकत्रित येऊन बाजारात कंसोलिडेशन होण्याची शक्यता आहे. निफ्टीला वरच्या पट्याच्या पलीकडे नेण्यासाठी आता कोणतेही विशेष अल्पकालीन 'ट्रिगर्स' नाहीत.
Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर