Vat Pournima : आगळीवेगळी वटपौर्णिमा! कुडाळमध्ये नवरोबांनी वडाला फेऱ्या घालत केला 'वट सावित्री व्रत'

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना


गेल्या १६ वर्षांची परंपरा


सिंधुदुर्ग : वटपौर्णिमा हा सण महिलाच साजरा करतात असं आतापर्यंत समजलं जात होतं. ७ जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेऊन वडाचे पूजन केले जाते. तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो. मात्र, गेली १६ वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.


सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातॊ. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी कामना करतात. वडाची पूजा करतात. पण स्त्री आणि पुरुष हि संसार रथाची दोन चाकं आहेत. म्हणून जस एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते तसं मग पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये, असा विचार करून कुडाळ मध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि मित्रमंडळी गेली १५ वर्ष आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरं करत आहेत. या व्रताचं यंदाच हे सोळावं वर्ष आहे. आज सुद्धा वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला सांगणं करून सर्वांच्या वतीने उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला.



आपली पत्नी दरवर्षी आपल्या दिर्घायूसाठी वट वृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितलं. हि परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी. आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा प्रा. अरुण मर्गज यांनी व्यक्त केली. महिला नेहमीच वटपौर्णिमा साजरी करतात पण कुडाळ मधले पुरुष गेली १६ वर्ष हे व्रत आपल्या पत्नीसाठी करताहेत ते तेवढंच कौतुकास्पद आणि सर्वानी आदर्श घेण्यासारखं आहे असं सौ. अमृता गाळवणकर यांनी सांगितलं.


यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ.अमृता गाळवणकर यांनी एकत्र वट वृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप, सुरेश वरक सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त मुंबई : स्थानिक स्वराज्य

Anand Paranjape: रामदास कदम आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अभद्र टिप्पणी करू नये;जशास तसे उत्तर देऊ -आनंद परांजपे

ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु

सॅमसंग इंडियाचा 'गॅलेक्‍सी ए०७ ५जी' लाँच

मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्‍सी ए०७ ५जी लाँच केला. या

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यामुळे भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाला मिळणार बळकटी

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच