पतौडी ट्रॉफी नाही आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात पतौडी ट्रॉफी खेळवली जात होती. आता या ट्रॉफीचे नामांतर करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी परस्पर सहमतीने घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final होणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या विशेष सोहळ्यातच अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये १८८ सामने खेळून ७०४ बळी घेतले आहेत. तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळून १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. अँडरसनने १४ कसोटी सामन्यांमध्ये सचिनला नऊ वेळा बाद केले होते. १९८९ ते २०२४ या कालावधीत सचिन आणि अँडरसन यांनी एकत्रितपणे ३८८ कसोटी सामने खेळले. यामुळेच ट्रॉफीला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५

पहिली कसोटी २० ते २४ जून - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - केनिंग्टन ओव्हल, लंडन
Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील