ChatGPT Down : चॅटजीपीटी डाऊन, कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची उडाली झोप!

चॅटजीपीटी (Chat Gpt) हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. लोकांनी त्याची क्षमता आजमावली आणि आता लोकांची क्रेझ वाढत आहे. कोडर्स याच्या मदतीने कोड लिहित आहेत. अनेक ठिकाणी मुलं याच्या मदतीने गृहपाठ करत आहेत. हल्लीचा जमाना हा ChatGPT चा आहे. किंबहुना लोकं आता इतक्या मोठ्या प्रमाणावर चॅट जीपीटीचा वापर करू लागले आहेत; की त्याशिवाय त्यांचं पानच हलत नाही. पण ChatGPT च्या युझर्ससाठी आजचा दिवस हा फारच कठीण आहे. कारण आज दुपारी २:४५ नंतर चॅटजीपीटी डाऊन झालं आहे. त्यामुळे जगभरातील युझर्स वैतागले आहेत.



वापरकर्त्यांना वारंवार दिसतोय 'नेटवर्क एरर'


ओपनएआयचे चॅटजीपीटी हे टूल ठप्प आहे. हा चॅटजीपीटीच्या वापरकर्त्यांसाठी निराशाजनक अनुभव आहे. अनेक वापरकर्त्यांना कोणताही प्रश्न विचारताच "हम्म... काहीतरी चूक झाली आहे असे पाहायला मिळत आहे" असा सामान्य संदेश मिळाल्याचे सांगितले, तर काहींना 'नेटवर्क एरर आला आहे. कृपया तुमचे कनेक्शन तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा. जर ही समस्या कायम राहिली तर कृपया help.openai.com वर आमच्या मदत केंद्राद्वारे आमच्याशी संपर्क साधा. अशा नोटिफिकेशनचा सामना करावा लागत आहे.



८२ टक्के लोकांना चॅटजीपीटीच्या मुख्य कार्यांचा वापर करण्यात समस्या येत होत्या


१४ टक्के लोकांना मोबाइल ॲपमध्ये समस्या येत होत्या.


४ टक्के लोकांना एपीआय इंटिग्रेशनमध्ये समस्या येत होत्या.


दरम्यान, अमेरिकेतील ९०० हून अधिक वापरकर्त्यांनी दुपारी २:४९ पर्यंत समस्या नोंदवल्या. ज्यामध्ये ९३ टक्के लोकांना चॅटजीपीटीच्या मुख्य वैशिष्ट्यांचा सामना करावा लागत आहे, ६ टक्के लोकांना अ‍ॅप संबंधित अडचणी आल्या आहेत. तर १ टक्के लोकांना लॉगिनमध्ये अडचणी येत आहेत.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व