Paytm News: आता नंबर नाही तर तुमच्या नावाचा असेल युपीआय आयडी - पेटीएम

प्रतिनिधी: पेटीएमने वैयक्तिकृत युपीआय आयडी (UPI ID) सुविधा नुकतीच सादर केली आहे. ही नवी प्रणाली प्रायव्हसी वाढवते आणि मोबाइल पेमेंट करण्याचा अधिक लवचिक मार्ग देते असा कंपनीने केला आहे. हा पुढाकार कंपनीच्या रोजच्या डिजिटल पेमेंट्सला सुलभ आणि सुरक्षित बनवण्याे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ही सेवा सध्या येस बँक आणि एक्सिस बँक यांनी जारी केलेल्या हँडल्सवर उपलब्ध आहे आणि लवकरच इतर बँकिंग भागीदारांपर्यंत विस्तारित केली जाईल. ही नवीन सेवा वापरकर्त्यांना नाव@पीटीयेस किंवा नाव@पीटीएक्सिस यांसारखी वैयक्तिकृत युपीआय आयडी निवडण्याची अनुमती देते,ज्यामुळे व्यक्ती आपला मोबाईल नंबर उघड न करता पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात.

तुम्ही एखाद्या दुकानदाराला पैसे देत असाल,डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सोबत हिशेब करत असाल किंवा नवीन विक्रेत्याकडे पैसे ट्रान्सफर करत असाल तरी पेटीएम हे भारतातील विश्वासार्ह आणि सुरक्षित पेमेंटचे साधन राहते असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वैयक्तिकृत युपीआय आयडीसह पेटीएम आता अधिक प्रायव्हसी प्रदान करते. जेव्हा वापरकर्ता (User) त्याच्या वैयक्तिकृत युपीआय आयडीचा वापर करून पैसे पाठवतो किंवा प्राप्त करतो, तेव्हा त्याचा मोबाईल नंबर व्यवहाराच्या तपशीलात दिसत नाही. हे वैयक्तिक माहितीचे संरक्षण करते आणि व्यक्तींना एक सरळसोपी आणि सहज ओळखता येणारी पेमेंट ओळख निर्माण करण्याची अनुमती देते. ग्राहकांसाठी हा एक वेगळा अनुभव देईल असा विश्वास कंपनीलख आहे.मुख्यत्वे कंपनीच्या मते हे व्यासपीठ सुरक्षा आणि दररोजच्या सोयीसाठी तयार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटीएम आता युएई,सिंगापूर,फ्रान्स,मॉरिशस,भूतान,श्रीलंका आणि नेपाळमध्ये युपीआय पेमेंट्स आदानप्रदान करतो.ज्यामुळे जागतिक भारतीय प्रवाश्यांना अधिक सोयी सुविधा मिळतात.

याविषयी बोलताना पेटीएम प्रवक्त्याने सांगितले म्हटले आहे की,' आम्ही पेमेंटमध्ये अधिक पर्याय आणि प्रायव्हसी प्रदान करण्यासाठी वैयक्तिकृत युपीआय आयडी सादर केली आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्हाला असा पाठपुरावा (Feedback) मिळाला की त्यांना त्यांचा मोबाईल नंबर खाजगी ठेवायचा आहे,आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हा उपाय तयार केला आहे.आम्ही अशा विचारपूर्वक नवकल्पनांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत ज्या सर्वांसाठी पेमेंट्स अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवतील.”

पेटीएम अ‍ॅपमध्ये वैयक्तिकृत युपीआय आयडी तयार करण्यासाठी:

पेटीएम अ‍ॅप उघडा

प्रोफाइल चिन्हावर टॅप करा आणि 'युपीआय सेटिंग्ज' मध्ये जा

मॅनेज युपीआय आयडी' निवडा आणि वैयक्तिकृत आयडी निवडा

नवीन युपीआय आयडी पेमेंटसाठी वापरण्यासाठी प्राथमिक युपीआय आयडी म्हणून कन्फर्म करा आणि अ‍ॅक्टिवेट करा

पेटीएमने मोबाइल पेमेंट्स अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आणखी सात प्रमुख नवकल्पना सादर केल्या आहेत:

१.प्रायव्हसी वाढवण्यासाठी पेमेंट लपवण्याची किंवा उघड करण्याची क्षमता

२.खर्चाचे स्वयंचलित वर्गीकरण आणि मासिक खर्च सारांश

३.मोबाइल होम स्क्रीनवर येणाऱ्या पेमेंट्ससाठी 'रिसिव्ह मनी' विजेट

४.जलद पेमेंटसाठी होम स्क्रीनवर 'स्कॅन अँड पे' विजेट

५.५००० रुपयापर्यंतच्या लो-वॅल्यू पेमेंटसाठी पेटीएम युपीआय लाइटसाठी ऑटो टॉप-अप

६.चांगल्या आर्थिक ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट पीडीएफ आणि एक्सेल फॉरमॅटमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय

७.सर्व युपीआय लिंक केलेल्या बँक खात्यांतील एकूण बॅलेन्सचे एकत्रित दृश्य – वैयक्तिक बॅलेन्स जोडण्याची गरज नाही.
Comments
Add Comment

Nashik News : बनावट पावत्या अन् बिले...२७ बँकाना दीड काेटींचा गंडा, एक ताब्यात

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या

Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.

Nashik Crime News : गणेशच्या आत्महत्येचा उलगडा होणार, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ

Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई

Fashion Tips: तुमचा ड्रेसिंग सेन्स बोरिंग वाटतोय? वॉर्डरोबमध्ये ॲड करा 'या' गोष्टी; तुमची पर्सनालिटी एका क्षणात बदलेल

तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश

Jeans Styling Tips : प्रत्येक मुलीने ट्राय करावेत जीन्ससोबतचे 'हे' ८ स्टायलिश टॉप्स

बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt) https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/ ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट