Time Technoplast Share: टाईम टेक्नोप्लास्टच्या शेअर्समध्ये तुफानी- मोतीलाल ओसवालकडून बाय कॉल 'टार्गेट प्राईज ५७८'

प्रतिनिधी: सोमवारी टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड (Time Technoplast) कंपनीच्या समभागात (Shares) मध्ये थेट ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने हा समभाग सध्या धूमाकूळ घालत आहेत. मोतीलाल ओसवाल कंपनीने या समभागाला महत्वाकांक्षी ठरवत सध्याच्या किंमतीवरुन हा समभाग भविष्यात जब्बर ४१ टक्क्याने वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या रिसर्च रिपोर्टमधील माहितीनुसार या समभागाला कंपनीकडून 'बाय' (Buy Call) मिळाला आहे. या शेअर्सची किंमत भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.


ब्रोकिंग कंपनी मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) कंपनीने या समभागाची किंमत ५७८ टार्गेट ठरवली असल्याने या कंपनीची शिफारस भागभांडवलधारकांना कंपनीने केली आहे. टाईम टेक्नोप्लास्ट ही भारतातील महत्वाची प्लास्टिक कंपनी मानली जाते. या कंपनीची व्याप्तीसाठी असलेली रणनीती (Expansion Growth Strategy) पाहता ही शिफारस मोतीलाल ओसवाल कंपनीने केली आहे.


मोतीलाल ओसवाल कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, करपूर्व भांडवल परतावा (Pre tax Return on Capital ROCE) हा २३ टक्क्याने तर केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर (Return on Invested Capital ROIC) यावर २६ टक्क्याने परतावा मिळू शकतो. चक्रवाढ वार्षिक दरवाढ उत्पन्न (Compund Annual Growth Rate CAGR) हा २० टक्क्याने तर कर व इतर खर्च पूर्व नफा (EBITDA) हा २३ टक्क्याने वाढू शकतो त्यामुळेच मग कंपनीच्या मार्जिनमध्ये अभूतपूर्व वाढ होण्याची शक्यता आहे.


टाईम टेक्नोप्लास्टच्या समभागात मागील सत्रात ४.७% वाढ होऊन तो प्रति समभाग दर ४११ वर पोहोचला. ९ जूनला रोजी तो ६.५% वाढून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि तो प्रति समभाग ४३७ रुपयांवर पोहोचला आहे. मोतीलाल ओसवाल कंपनीने रिसर्चमध्ये दिलेल्या माहितीनुसार या कंपनीचा प्लास्टिक उत्पादन क्षेत्रात ५० ते ६० टक्के बाजार वाटा (Market Share) आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'