गणेश विसर्जनासाठी आता आखणार चिन्हांकित रेखा

मुंबईतील समुद्रात पालिका बसवणार दिशानिर्देशक सौर दिवे


मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाही.


मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, नुहु, वर्सोवा, आक्सा आणि गोराई चौपाटी येते. या समुद्रात गणेशमूर्तीचे तसेच देवीच्या मूर्तीचेही विसर्जन होते. मोठ्या मूतौच्या विसर्जनासाठी अनेक जण समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय मूर्ती विसर्जन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्या बाहेर काढण्यासाठीही बरीच खटाटोप करावी लागते. बऱ्याच वेळा ओहोटीनंतर या मूर्ती चौपाट्यांवर इतस्ततः पसरलेल्या असतात, तर अनेक मूर्ती समुद्रातही खोलवर असतात. त्यामुळे ओहोटी रेषा व भरती रेषा या दरम्यान चिन्हांकित करून विसर्जनाचे क्षेत्र दर्शवणारे दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील पर्यावरण विभागाने
दिली. यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी समुद्रातून १०० टक्के मूर्ती सहज बाहेर काढण्यास शक्य होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


या दिशानिर्देशकावर सौर दिवाही असेल, जेणेकरून मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना तो स्पष्टपणे दिसेल. या कामासाठी निविदाही काढण्यात आली आहे. सहा चौपाट्यांवरील एकूण ४३ ठिकाणी ही नवीन दिशादर्शक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावणाची हानी थांबवणे हाही उद्देश आहे. यामध्ये ताज्या असलेल्या केंद्र शासनाची मान्यता असलेल्या दोन संस्थांच्या देखरेखीखाली ही मंत्रणा बसवण्यात येणार आहे. मुंबईतील ओहोटी रेषा, भरती रेषा नेमकी कुठली आणि कुठपर्यंत सौर दिवा असलेली दिशानिर्देशक यंत्रणा बसवावी, हे या दोन संस्था निश्चित करणार आहे. या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १६ जून आहे. ही यंत्रणा यंदाच्या गणेशोत्सवाआधीच चौपाट्यांवर बसवण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.



प्रदूषणमुक्तीसाठी पाऊल


मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर, मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासाठीही यंदा त्याची अंमलबजावणी केली जात आहे, त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सौर दिव्यांसह दिशानिर्देशक हा त्याचाच भाग असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यावर नियंत्रण येईल, तसेच ठिकाण निश्चित केल्यानंतर, तेथून जास्तीत जास्त मूर्ती बाहेर काढून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न असेल.


या सहा समुद्रात यंत्रणा


गिरगाव चौपाटी
दादर शिवाजी पार्क
जुहू, वर्सोवा
अक्सा
गोराई


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य