मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ?

कोपरगाव : शहरात मोकाट जनावरे, गायी, वळू, गाढव, डुकरे, कुत्रे यांच्याकडून निष्पाप नागरीकांना नेहमीच त्रास होतो. सावरकर चौकात जनावरांनी एका दाम्पत्याला जोरदार हुंदडले, त्यात ते जखमी झाले. नागरीक या जनावरांचा बंदोबस्त करावा याची मागणी करतात. काही दिवस जातात पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित होतो. नगरपालिका या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


मागील काही वर्षांपूर्वी या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आंदोलने केली. मोकाट जनावरे नगर पालिकेच्या आवारात हुसकावून नेली. त्यांच्या गळ्यात "भावी नेते, नगरसेवक, नगरअध्यक्ष, आमदार मुख्याधिकारी" अशा उपहासात्मक बोर्ड लावले.त्यावेळी तरी या जनावरांचा बंदोबस्त करतील असे वाटले होते.


मात्र एका बेगडी गो प्रेमींने गो मातेला मोकाट हा शब्द वापरू नका असा सल्ला दिला.या पुर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्यात दोन लहान मुले जखमी झाले. डुकराने एका महिलेवर हल्ला केला. अशा एक ना अनेक घटना घडल्या आहेत.


मोकाट जनावरांचा सर्व्हे करून त्यांना शिंगांना रेडियम अथवा विशिष्ट बॅच लावावे असे सुचवले. नगर पालिकेच्या गतिमान प्रशासनाला जाग आल्यावर कुत्रे पकडण्याचे टेंडर काढले जाते. कुत्रे गावा बाहेर सोडल्यावर पुन्हा गावात येतात डुकरांच्या मालका सोबत नगर पालिका कर्मचारी संगनमत हा व्यवसाय करतात.


ही डुकरे मोठ्या शहरात विक्री केली जातात अशी खाजगीत चर्चा केली जाते. दूसरी धक्का दायक माहिती अशी की, गो मांस विक्रीचा व्यवसाय शहरात जोरात सुरू आहे. नवीन आणलेली जनावरे शहरात सोडून दिली जातात. नवीन व नवीन जनावरे यांच्यात रस्त्यांवर संघर्ष होतो या जनावरांची मोजदाद नसल्याने तेच पुढे या चुकीच्या कामासाठी वापरली जातात. त्यात सुध्दा काही लोकांचे हात ओले केले जातात.


नगर पालिका प्रशासन यांनी नागरिकांची ओरड झाल्यावर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्णय घेतला तर लगेचच काही पशू प्रेमी विरोध करतात.कर्मचाऱ्यांना दम दाटी करतात.त्यांची तक्रार प्राणीमात्र संघटने कडे करू अशी धमकी देऊन आर्थिक तडजोडी केल्या जातात.अशा प्रकारे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो मात्र वास्तव सब गोल माल है भाई सब गोल माल है असेच दिसते. अशी टीका लोकसभा आंदोलनाचे ॲड नितीन पोळ" यांनी केली आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक