'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

  74

मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) आज पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला आज सकाळी ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, प्लॅटफॉर्म क्रमांक 18, मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला.


या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत तरी पर्यटकांनी याचा अनुभव घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.


 


पर्यटकांची चांगली पसंती


भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे. दि.09 जुन 2025 रोजी पासून सुरु होणारी ट्रेन पुर्णत: आरक्षित झाली असून पर्यटकांची चांगली पसंती दिली आहे.


“छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. या उपक्रमासाठी महामंडळाचे सर्व अधिकारी समन्वय आणि परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे.


सहल तपशील –


सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ


दिनांक: 09 जून 2025


कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)


प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई


प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे


यात्रेचा प्रवासमार्ग: मुंबई (CSMT) - रायगड - पुणे - शिवनेरी - भीमाशंकर - प्रतापगड - कोल्हापूर - पन्हाळा - मुंबई.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता