महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


नागपूर : महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार दि. ७ रोजी केले.


आरबीएल बँकेतर्फे उम्मीद या समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचे उदघाटनही यावेळी करण्यात आले. आमदार संदीप जोशी, प्रवीण दटके, आरबीएलचे कोषाध्यक्ष अशोक चांडक व संचालक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनीष नगर परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते १०० सायकलींचे वाटप करण्यात आले.


नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कवंडे या गावी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अत्याधुनिक सुविधा व साधनांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. आरबीएलने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. आरबीएलचे कोषाध्यक्ष अंशुल चांडक यांनी प्रास्ताविक करताना, यावर्षी १८०० सायकलींचे वितरण करण्यात येणार असून मागील वर्षी ४८०० सायकली विद्यार्थिनींना देण्यात आल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि