लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास


विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के तिकीट सवलतीला महिलांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १८ हजार प्रवासी संख्या असलेल्या महिला प्रवाशांचा आकडा पाचव्या दिवशी ३० हजारावर गेला आहे.


महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७ मार्गांवर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांकडून या उपक्रमाच्या श्रेयासाठी करण्यात आलेल्या दाव्यावरून ही योजना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता वसई-विरार महापालिकेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या योजनेची खूप चर्चा आहे.



तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना एक जूनपासून प्रारंभ करण्यात आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशीपासून महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेलेला आहे. २ जून रोजी २५ हजार ११२, ३ जून रोजी २८ हजार ०५०,४ जूनला २८ हजार ५७५ आणि ५ जून रोजी ३० हजार ३९२ अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये एकूण १ लाख ३० हजार ९८५ महिला प्रवाशांनी सवलतीच्या तिकीट दराचा फायदा घेत महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत असल्याबाबत महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत आहे.



वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग पीडित रुग्ण अशा काही प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विश्वनाथ तळेकर, सहा.आयुक्त परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका
Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत