नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

  82

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज, त्या केवळ विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रिय भागच घेत नाहीत, तर शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन मानदंडही प्रस्थापित करत आहेत. मागील ११ वर्षांत, आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.


पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमांवरील पोस्ट मालिकेद्वारे टिप्पण केले आहे. मोदी यांनी गेल्या ११ वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर सरकारचे लक्ष अधोरेखित करून विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी बजावलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.


पंतप्रधान म्हणाले की, एनडीए सरकारने प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वच्छ भारत अभियानाद्वारे सन्मानाची खात्री देणे, जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेश आणि तळागाळातील सक्षमीकरण यांचा समावेश आहे. उज्ज्वला योजनेचे उदाहरण देत त्यांनी अनेक घरांमध्ये धुरमुक्त स्वयंपाकघरे आणणारा एक मैलाचा दगड म्हणून उल्लेख केला. मुद्रा कर्ज योजनेमुळे लाखो महिला उद्योजक झाल्या असून, त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकल्या आहेत, हे देखील त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घरे देण्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सक्षमीकरणाच्या भावनेवर उल्लेखनीय परिणाम झाला आहे.


पंतप्रधानांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची आठवण काढत ही चळवळ मुलींच्या संरक्षणासाठी एक राष्ट्रीय चळवळ असल्याचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, विज्ञान, शिक्षण, खेळ, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांसह सर्व क्षेत्रांमध्ये महिला उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत.

Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी