ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा


मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ई-शिवनेरीच्या सेवेला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. ई-शिवनेरीमुळे महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटींची भर पडली असल्याने उदंड प्रतिसादात ई-शिवनेरीची घोडदौड दोन वर्षानंतरही कायम आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरीच्या रोज २४ फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. या फेऱ्यांमधून महामंडळाने ४९ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ठाणे-पुणे मार्गावरही प्रवाशांनी ई-शिवनेरीच्या प्रवासाला पसंती दिली.त्याचबरोबर ठाणे-पुणे ई-शिवनेरी जेव्हा सुरु झाली तेव्हा अवघ्या सात दिवसात दीड हजार प्रवाशांनी प्रवास करत २० लाखांहून अधिक महसूल मिळवला आहे. या मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू आहेत.


रोज ई-शिवनेरीच्या तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसांत ८१ रुपये प्रति किमी या दराने २० लाख ६७ हजार रुपये ई-शिवनेरीने कमावले आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र दिनी अर्थात, एक मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे-पुणे मार्गावर पहिली ई-शिवनेरी धावली. परळमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर मेच्या पहिल्या पंधरवड्यात दादर-पुणे मार्गावर ई-शिवनेरी धावू लागली. शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारगेट या मार्गावर धावते.


दादर ते कळंबोलीपर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द ,वाशी, सानपाडा, नेरुळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल हे प्रमुख थांबे असून एकूण २२ शहर बस थांबे आहेत.


इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्य


इलेक्ट्रिक बस एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकणार आहे. प्रत्येक सीटजवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.
बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४३ प्रवासी बसू शकतात.


फेरी संख्या
मे २०२३ रोज फेरी संख्या ६
मे २०२५ रोज फेरी संख्या २५


फेरी कालावधी
मे २०२३ दर तासाने
मे २०२५ - ३० मिनिटांनी
मुंबई फेऱ्या : २४
पुणे फेऱ्या : २४

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका