येऊर जंगलात प्लास्टिक विरोधात स्वच्छता मोहीम

  58

ठाणे  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असतानाच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काच व अन्य घनकचरा गोळा करण्यात आला.


गेल्या काही वर्षांपासून येऊर वन परिक्षेत्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, व मद्यपानानंतर टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जंगलात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यामुळे केवळ जंगलाचे सौंदर्यच नाही तर प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन संरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील व उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पर्यावरण प्रेमींनी संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्हज्, कचरा गोळा करण्याचे साहित्य घेत जंगलात फिरून विविध भागांतील प्लास्टिक, थर्माकोल, काच, सिगारेट पाकिटे व इतर अविघटनशील कचरा संकलित केला असल्याची माहिती वनपाल रमाकांत मोरे यांनी दिली


या उपक्रमादरम्यान वन विभागाने पर्यावरण जागृतीसाठी माहिती फलकही उभारले. ‘कृपया प्लास्टिक जंगलात टाकू नका’, ‘निसर्ग हा आपल्या पुढच्या पिढ्यांचा हक्क आहे’ अशा संदेशांद्वारे पर्यटकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. या स्वच्छता मोहिमेत वनपाल रमाकांत मोरे, आशुतोष पवार, केशव बनसोडे आणि पर्यावरण प्रेमी मिलिंद जाधव, अतुल मोरे, नीलेश शिवशरण आदींनी अथक परिश्रम घेतले.



“जंगल हे केवळ पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट नसून, हजारो वन्यजीवांचे घर आहे. अशा मोहिमांमधून हे पटवून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. येऊरमधील आजची स्वच्छता मोहीम ही एक सकारात्मक सुरुवात आहे – जी भविष्यातील शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा पाया ठरू शकते.”
- प्रदीप पाटील (उपसंचालक येऊर वन विभाग)

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या