छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

  100

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुंबईत हिरवा झेंडा 


मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी  तसेच = छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची घोषणा केली आहे. ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train)  दि.०९ जून २०२५  पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला ९ जून रोजी सकाळी 6.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, प्लॅटफॉर्म क्रमांक 18, मुंबई येथे   हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई व पर्यटन राज्यमंत्री  इंद्रनिल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.


या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम  आयोजित  केले जाणार आहेत तरी पर्यटकांनी याचा अनुभव घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.


पर्यटकांची चांगली पसंती


भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे. दि.09 जुन 2025 रोजी पासून सुरु होणारी ट्रेन पुर्णत: आरक्षित झाली असून पर्यटकांची चांगली पसंती दिली आहे.



 “छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी  यांनी केले आहे. या उपक्रमासाठी महामंडळाचे सर्व अधिकारी समन्वय आणि परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे.



सहल तपशील –


सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ 

दिनांक: 09 जून 2025

कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे

यात्रेचा प्रवासमार्ग: मुंबई (CSMT) - रायगड - पुणे - शिवनेरी - भीमाशंकर - प्रतापगड - कोल्हापूर - पन्हाळा - मुंबई.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने