टोल मागितला म्हणून कर्मचाऱ्याला ट्रकखालीच चिरडले, भरधाव वेगाने फरफटत न्हेले! विसापूर टोल पोस्टवरील धक्कादायक घटना

  84

चंद्रपूर:  महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील विसापूर टोल पोस्टवर (Visapur Toll Post)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल कर्मचाऱ्याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचाऱ्याच्या अंगारून गाडी न्हेली, क्रूरतेचा कळस म्हणजे इथेच तो थांबला नाही तर, त्याने काही मीटर टोल कर्मचाऱ्याला फरफटत देखील न्हेले. ज्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर वाहन चालक बेपत्ता जरी असला तरी, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणाऱ्या एका टाटा एस कारने टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडली. यादरम्यान, एका टोल कर्मचाऱ्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने गाडी थांबवली नाही आणि कर्मचाऱ्याला चिरडून गाडी भरधाव पुढे न्हेली. ज्यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल


जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव संजय अरुण वांद्रे असे आहे. त्याचे वय २७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. संजय अरुण वांद्रे हा बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. या घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधील विसापूर टोल नाक्यावर टोल टाळण्यासाठी टाटा एस कारचा चालक लाईन ओलंडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला चिरडून गाडी वेगाने पुढे न्हेली. ज्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

Comments
Add Comment

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन