जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी आता आठ मजली इमारत

  56

पावसाळ्यानंतर बांधकामाला होणार सुरुवात, निधी प्राप्त


अलिबाग : जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळच्या जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी बांधण्यात येणाऱ्या नवीन वसाहतीची प्रतीक्षा आता संपलेली असून, याठिकाणी २१२ घरांची आठ मजली इमारत उभी राहणार आहे. पावसाळ्यानंतर या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


पोलीस मुख्यालय हे अलिबाग शहरात आहे. पोलिस दलात सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४० वर्षांपूर्वी मुख्यालय येथे बैठ्या चाळी बांधण्यात आल्या होत्या. कालांतराने बैठ्या चाळी जीर्ण होऊ लागल्याने त्यांची पडझड झाली. त्यामुळे एकेक चाळ रिकामी करून ती पाडण्यात आली. त्यामुळे सध्या वसाहतीची जागा मोकळीच आहे. अंमलदारांसाठी १९२, निरीक्षक १६, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसाठी चार अशी या नव्या इमारतीची रचना असेल. या बांधकामाला शासनाची परवानगी मिळालेली असून, बांधकामासाठी निधीही प्राप्त झाला आहे. निविदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे.


पोलीस मुख्यालयात पोलीस अंमलदारांसाठी एकूण ३६ शासकीय निवासस्थाने सुस्थितीत आहेत. प्रतीक्षा यादीप्रमाणे निवासस्थाने वाटप करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत पोलीस अंमलदार निवासस्थानासाठी २१ पोलीस अंमलदार प्रतीक्षा यादीवर आहेत. राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय यांचेकडून अधिकारी, अंमलदारांची सेवानिवृत्ती, बदली इत्यादी कारणांमुळे निवासस्थानांच्या वाटपाबाबत अहवाल कार्यालयात मंजुरीसाठी आल्यानंतर प्रतिक्षा यादीवरील पुढील अंमलदारांना त्या निवासस्थानाचे आवश्यकतेबाबत पुन्हा एकदा विचारणा होऊन वाटप करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना अडचणींचा करावा लागतोय सामना अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज

खाद्य रंगांसह वर्तमानपत्रांचाही वापर न करण्याच्या व्यावसायिकांना सूचना अलिबाग : गणेशोत्सवाच्या

अलिबाग तालुक्यात स्मार्टमीटर बसविण्याला वेग

१५ हजारांहून अधिक मीटर बदलले ग्राहकांना वीजबिलात घट होण्याची शक्यता अलिबाग : विविध राजकीय पक्षांसह वीज

नगरपालिकेत समाविष्ट होण्यास वरसोली ग्रामपंचायत उत्सुक

कुरूळ ग्रामपंचायत अनुत्सुक; हद्दवाढीबाबत मागविल्या हरकती अलिबाग : नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या

Accident News: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एस. टी. बसेसची भीषण धडक, दोन चालकांसह ९ प्रवासी जखमी

महाड: महाड एसटी बस आगारातून सुटलेली महाड सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एस. टी. बसेसची