99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

  165

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन


पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.  आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असेल.


या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली.



३२ वर्षांनंतर साताऱ्यात होणारे चौथे साहित्य संमेलन


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, "साताऱ्याला ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती. "



संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम


सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडीअमवर ही संमेलन भरवले जाणार आहे. या ठिकाणीच 1993 साली 66वे संमेलन झाले होते. छत्रपती शाहू स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे.



स्थळ निवड समिती


या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.