Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

  146

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या दानपेटीत दररोज लाखों रुपये तसेच इतर वस्तूंचे दान केले जाते. ज्याची मोजणी मंदिराच्या ट्रस्टद्वारे केली जाते, मात्र यादरम्यान लाखों रुपयांची चोरी झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. कहर म्हणजे, ही चोरी ३० वर्षांपासून सेवा देणाऱ्या, मंदिराच्या एका कायमस्वरूपी कर्मचारीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दानपेटीतील पैसे मोजताना ही चोरी केल्याचा आरोप आहे.



सीसीटीव्हीद्वारे चोरी पकडली 


मंदिर ट्रस्टमध्ये गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेला स्थायी कर्मचारी बाळासाहेब नारायण गोंदकर याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याने एप्रिल महिन्यात तीनदा ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे चोरी केले. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ट्रस्टने शिर्डी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.


साईबाबा मंदिरात आठवड्यातून दोनदा शेकडो न्यास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देणगीची रक्कम मोजली जाते. या काळात, प्रवेश आणि बाहेर पडताना प्रत्येक कर्मचाऱ्याची तपासणी केली जाते आणि मोजणी हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जातात. असे असूनही, गोंदकरने एप्रिल महिन्यात तीनदा ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चोरले.


गोंदकर मोजणी केल्यानंतर बंडल त्याच्या पॅन्टमध्ये लपवत असे आणि नंतर नोटा मोजण्याच्या मशीनखाली ठेवत असे. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी साफसफाईच्या बहाण्याने आत जाऊन बंडल बाहेर काढत असे. पण एकदा तो बंडल बाहेर काढू शकला नाही आणि इतर कर्मचाऱ्यांना ते बंडल सापडळे. त्यानंतर ट्रस्ट प्रशासन सतर्क झाले आणि सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. ज्यामुळे हा सर्वप्रकार निदर्शनास आला.



पोलिसांनी आरोपीला अटक केली


गोंदकर सीसीटीव्हीमध्ये नोटा चोरताना दिसला असून, त्या पुराव्याच्या आधारे ट्रस्टने शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाळासाहेब गोंदकरला ताब्यात घेऊन राहाता न्यायालयात हजर केले आहे.


या घटनेवर उपअधीक्षक शिरीष वामणे म्हणाले की, सुरुवातीच्या तपासात सुमारे १.२५ ते १.५ लाख रुपये चोरीला गेले आहेत. स्थानिक लोकांच्या मते, चोरीच्या घटना बऱ्याच काळापासून घडत होत्या. आता पुढील तपासात इतर कोणते आरोपी बाहेर येतात हे पाहणे बाकी आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची