मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

रेल्वेची विविध कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय


मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार दि. ८ जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


यामुळे पुढील अप मेल/ एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन, पटना- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस तर पुढील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्सप्रेस या गाड्या वळवण्यात येतील.


हार्बर लाईन ब्लॉक विभागाने पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.


ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभागाने पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स- हार्बर लाईन सेवा ११.०२ ते १५.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा १०.०१ ते १५.२० पर्यंत रद्द राहतील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात


ठाणे- वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात बेलापूर/ नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची