Deepika Padukone : अल्लू अर्जुन-अ‍ॅटलीच्या चित्रपटात दीपिका पादुकोणची जबरदस्त एंट्री

  102

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सतत चर्चेत आहे. विशेषतः जेव्हा त्यांनी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या चित्रपटातून माघार घेतली, तेव्हापासूनच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. काही वृत्तांनुसार, त्यांच्या अटींमुळे दिग्दर्शक नाराज झाले आणि त्यांनी दीपिकाला चित्रपटातून वगळले. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम देणारी आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दीपिका पदुकोण आता दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येणार असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.


हा भव्य प्रोजेक्ट दिग्दर्शक एटली आणि सन पिक्चर्स यांच्या संयुक्त निर्मितीखाली साकारला जाणार आहे. घोषणेसोबतच सोशल मीडियावर एक खास व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दीपिका आणि एटली स्क्रिप्टवर चर्चा करताना दिसत आहेत. या बातमीने दीपिकाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते म्हणत आहेत की, हा चित्रपट निश्चितच एक ब्लॉकबस्टर ठरणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन यांची पहिल्यांदाच रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये या नव्या जोडीबद्दल जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.हा चित्रपट प्रदर्शित कधी होईल आणि त्याचे नाव काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



निर्मात्यांनी केले दीपिकाचे स्वागत


निर्मात्यांनी काल शुक्रवारी (६ जून) अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांच्या ‘AA२२xA६’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. आज शनिवारी (७ जून) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. सन पिक्चर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात दीपिका पादुकोणदेखील दिसत आहे. निर्मात्यांनी चित्रपटात तिचे स्वागत केले आहे. टीझरबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘विजयाच्या मार्गावर कूच करणारी राणी, दीपिका पादुकोणचे स्वागत आहे.’टीझरमध्ये दीपिका ज्या पद्धतीने दिसत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की ती चित्रपटात एक दमदार भूमिका साकारणार आहे. प्रेक्षकांना तिच्या अ‍ॅक्शनची ताकदही पाहायला मिळेल. अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीबरोबरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Comments
Add Comment

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : ‘१२० बहादुर’ चित्रपटाच्या पोस्टरच्या धमाकेदार अनावरणानंतर एका दिवसातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

'दशावतार' सिनेमाचा टीझर रिलीज, दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट

मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी 'दशावतार'

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर