मीरा रोड, भाईंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक

मुंबई : मेट्रो लाईन ९ साठी गर्डर लावण्याच्या कामाच्या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार दि. ७, जून रोजी मध्यरात्री ०१:३० ते रविवार दि. ८ पहाटे ३:१५ पर्यंत १.४५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दि. ८ / सोमवार ९ जून आणि सोमवार दि. ९/ मंगळवार दि. १० जूनच्या मध्यरात्री १:४५ ते ३:०० वाजेपर्यंत १.१५ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार काही उपनगरीय सेवा प्रभावित होतील आणि काही रद्द राहतील.


शनिवार दि. ७/ रविवार दि. ८ जून रोजी चर्चगेट ते विरार ही शेवटची लोकल ट्रेन २३:५८ वाजता सुटेल. चर्चगेट ते भाईंदर ही शेवटची लोकल ट्रेन २३:३८ वाजता सुटेल. विरार ते चर्चगेट ही शेवटची लोकल ट्रेन ००:०५ वाजता सुटेल. तसेच रविवार ते सोमवार रोजी चर्चगेट ते विरार शेवटची लोकल ट्रेन ००:२० वाजता सुटेल.


• विरार ते चर्चगेट शेवटची लोकल ट्रेन ००:०५ वाजता सुटेल. सोमवार ते मंगळवार रोजी चर्चगेट ते विरार शेवटची लोकल ट्रेन ००:२० वाजता सुटेल.


•विरार ते चर्चगेट शेवटची लोकल ट्रेन ००:०५ वाजता सुटेल.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून