काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील हरोगेरी गावात तीन दलित मुलांना एका खांबाला बांधून साठ जणांनी बेदम चोपले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन मुलांपैकी एकाने विषाचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या या मुलावर हबल्लीतील 'किम्स'मध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दलित मुलांवर एका मुलीला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप करण्यात आला. मुलांची बाजू ऐकून घेण्याऐवजी त्यांना खांबाला बांधून बेदम चोपण्यात आले. दोरी, चप्पल आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी हरोगेरी गावातील घटनेप्रकरणी एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे, तर शुक्रवारी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनेक आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत ३० जणांविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.

 
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या