गायमुख घाट रस्त्याला पावसाचा फटका

मायक्रो सर्फेसिंगचे काम अपूर्ण


ठाणे : ठाण्याहून वसई, गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर रोड महत्त्वाचा मानला जातो. अशातच या मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावरील चढण आणि पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. यंदादेखील या मार्गावरील ५०० मीटरच्या रस्त्याच्या कामासाठी १० ते १५ दिवसांचा ब्लॉक घेऊनदेखील अद्यापही या रस्त्याच्या मायक्रो सर्फेसिंगचे काम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


मुंबई, पालघर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशातच पावसाळ्यात उड्डाणपुलावरील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत भर पडत असते. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने चढण-कमी करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला; मात्र त्याला वन विभागाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.


त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गायमुख घाटातील त्या ५०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार यंदादेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.गायमुख घाट ठाण्याच्या हद्दीत असून, त्यातील काही भाग प्रचंड चढणीचा आणि तेवढ्याच उताराचा आहे. तसेच घाटावर मोठे वळणदेखील असल्याने यावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी घाटाची दुरुस्ती करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. गेल्यावर्षी या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करून त्यावर डांबराचा थर टाकला होता; मात्र पाऊस सुरू होताच काही दिवसांतच तो थर उकडल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा कठीण झाली होती. त्यामुळे तो वाहनांची कोंडी करणारा ठरतो.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून