Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. पुण्यातील गोळीबार मैदानात बकरी ईद निमित्त परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर होणाऱ्या नमाज पाठणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (७ जून) कोणते रस्ते बंद राहणार आणि पर्यायी मार्ग कोणते असणार ते जाणून घेऊयात.



भैरोबानाला ते गोळीबार मैदान


शहरातील भैरोबानाला ते गोळीबार मैदान हा रस्ता सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात स्वारगेटकडे जाणारी जड वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने-लुल्लानगर चौकाकडे वळविली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशनकडे वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्याने मार्गस्थ केली जाणार आहेत.



मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान


मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान हा मार्गही उद्या सकाळी बंद राहणार आहे अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी बिशप स्कूल मार्ग/कमांड हॉस्पिटल मार्ग ते नेपिअर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून इच्छित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक


जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक हा रस्ता शनिवारी सकाळी बंद राहणार आहे. या रस्त्याने प्रवास करणारे लोक खाणे मारुती चौक-पुलगेट डेपो-सोलापूर बाजार चौक-नेपिअर रस्ता-खटाव बंगला चौका मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात. तसेच लुल्लानगर चौकातून गोळीबार चौकाकडे जाताना जड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. दरम्यान वाहतूक पोलीसांनी उद्या सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



सीडीओ चौक ते गोळीबार चौक


सीडीओ चौक ते गोळीबार चौक हा रस्ताही सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळवली जाणार आहेत, तर खटाव बंगला चौकाकडून येणारी वाहने उजवीकडे नेपिअर रस्त्याकडे वळविली जाणार आहे. तसेच सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान हा रस्ताही बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि