Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!

मुंबई : प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'हेड ऑफ स्टेट' सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रियंका जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम केलंय. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहेत उत्सुक आहेत. आता अखेर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला असून चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.



'हेड ऑफ स्टेट' या चित्रपटाच्या २ मिनिट ४६ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये दिसतंय की, ब्रिटनचे पंतप्रधान सॅम क्लार्क (इद्रिस एल्बा) आणि अमेरिकेचे अध्यक्ष विल डेरिंगर (जॉन सीना) हे एका संकटात सापडतात आणि मग प्रियंकाची एन्ट्री होती. ती प्रियंका एक शांत, तीक्ष्ण, चपळ एजंटच्या भुमिकेत दिसतेय. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.



कधी होणार रिलीज


'देसी गर्ल'चा हॉलिवूड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार नाही, तर थेट ओटीटीवर येतोय. हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. ट्रेलरमध्ये दिसत असेलल्या अ‍ॅक्शन सीन्ससाठी प्रियंकानं प्रचंड मेहनत घेतली होती. चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं, तेव्हा तिनं अनेकदा जखमी झाल्याचं फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट दिलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो यशस्वी ठरणार, यात शंका नाही.

Comments
Add Comment

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

आजीच्या साडीतून बनवलेला कॉश्च्यूम घालून रोहित राऊतने गायले 'रोअर ऑफ सह्याद्री'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८

TMKOC फेम भव्य गांधीने बबितासोबतच्या साखरपुड्याच्या अफवेवर सोडलं मौन

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता भव्य गांधी, म्हणजेच सगळ्यांचा

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील