नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, पीजी नीट परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने तारीख निश्चित केली.


परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे न्यायालयाने आदेश देताना सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला. ३० मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यासाठी एनबीईला परवानगी देत आहोत. यापुढे वेळ वाढवून दिला जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.


याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला दोन महिने वेळ का हवाय, असा प्रश्नही न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला केला होता. त्यावर एनबीईने तांत्रिक कारणे आणि केंद्राची निवड करण्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले. कोर्टाने त्याला परवानगी दिली.


न्यायमूर्ती पी.के मिश्रा यांनी मंडळाला तुम्हाला ३ ऑगस्ट पर्यंत वेळ हवा आहे. पण, तुम्हाला इतका वेळ का हवा आहे? असा प्रश्न विचारला होता. ए.जी. मसीह म्हणाले की, ३० मे रोजी न्यायालयाने आदेश देऊनही तुम्ही अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? विलंब होण्यास हेही कारण आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वेळ का हवाय? यावर एनबीईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जवळपास २.५ लाख विद्यार्थी आणि ४५० परीक्षा केंद्र आहेत. जर परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असेल, तर ५०० केंद्राची गरज आहे. त्यामुळे केंद्रांची निवड करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करण्यासंदर्भात वेळ लागणार आहे, असे एनबीईने कोर्टात सांगितले होते.त्यानंतर कोर्टाकडून वेळ वाढवून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी