Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून उन्हाळ्यामध्ये अंजीर शरीराला थंड, ऊर्जा आणि अनेक प्रकारचे फायदे मिळवून देते. तुम्ही सुके अथवा ओले कसेही अंजीर खाऊ शकता. मात्र ड्रायफ्रुट्सच्या रूपात हे भिजवून खाल्ल्यास याचे अनेक फायदे मिळतात.


यासाठी तुम्ही अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. तुम्ही अंजीर दुधात उकळूनही खाऊ शकता. जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.



जाणून घ्या अंजीरचे फायदे


पचनक्षमता सुधारते


अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे पाचशक्ती सुधारण्यास मदत होते. अंजीर बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोटदुखीसारख्या समस्यांपासूनही दिलासा देते.


हाडे होतात मजबूत


अंजीरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.


रोगप्रतिकारक क्षमता वाढते


अंजीरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात यामुळे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


वजन कमी करण्यात फायदेशीर


अंजीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण यात फायबर असते.

Comments
Add Comment

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून