
जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या कोटा शहरात आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ताने तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून ही रक्कम अनधिकृतरित्या काढून शेअर बाजारात गुंतवली होती.
आयसीआयसीआय बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर असलेल्या साक्षी गुप्ता ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलत होती आणि त्या जागी तिच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर नोंदवत होती, जेणेकरून ओटीपी आणि व्यवहारांची माहिती मूळ खातेदारांपर्यंत पोहोचू नये. तिने वैयक्तिक ३ लाख ४० हजारांचे कर्ज मंजूर करून घेतले, तसेच ३१ एफडी वेळेच्या आधीच बंद करून १ कोटी ३४ लाखांहून अधिक रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली. तिने डिजिटल बँकिंग, इंस्टा किओस्क आणि चार ग्राहकांच्या डेबिट कार्डचा वापर करत व्यवहार केले आहेत.

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात झाल्याने बाजाराच्या मूलभूत स्थितीत (Fundamentals) ...
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला असता. तपासात हे स्पष्ट झाले की, तिने २०२० ते २०२३ दरम्यान ही फसवणूक केली असून, एका प्रकरणात ३ कोटी २२ लाख रुपये एका वरिष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून गायब करण्यात आली होती. साक्षी गुप्ताला ३१ मे रोजी अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबीयांचेही व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
एका ग्राहकाने त्याच्या एफडीबद्दल विचारपूस करण्यासाठी बँकेत आल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बँकेने १८ फेब्रुवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला. व्यवहाराच्या संदेशांची माहिती त्यांना मिळू नये म्हणून महिलेने खात्यांशी जोडलेल्या ग्राहकांचे मोबाईल नंबरही बदलले. "तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फोन नंबर या खात्यांशी जोडले आणि ४ कोटींहून अधिक रुपये काढले. खातेधारकांना फसवणुकीची कल्पना येऊ नये म्हणून तिने तिच्या सिस्टमवर ओटीपी मिळवण्यासाठी एक प्रणाली देखील तयार केली," असे तपास अधिकारी इब्राहिम खान म्हणाले. आयसीआयसीआय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी एफआयआर दाखल केला आहे आणि कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.