कोकणातला जुना वाडा, नवी पिढी आणि ‘अंधार माया’ वेब सीरिजचा गूढ प्रवास

'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू कुटुंब त्यांच्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी कोकणातल्या त्यांच्या मूळ वाड्यावर एकत्र येतं, पण प्रत्येकाचं या भेटीमागचं कारण वेगळं असतं. काहींना वाडा विकायचा असतो, काहींना त्याचं जतन करायचं असतं.


पहिल्याच सीनमधून प्रेक्षकांना ही केवळ कुटुंबकथा नसून, गूढतेने वेढलेली गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. प्रसंग काही वेळा अतिशय वेगात घडतात, तर कधी खूप संथ. त्यामुळे काही वेळा गोंधळ उडतो, पण तरीसुद्धा कथा आपल्या पकडीत ठेवते.


या सगळ्यात एक पात्र सतत हजेरी लावतं. कधी ते भूतकाळ असतं, कधी वर्तमान, तर कधी येणाऱ्या संकटाची सावली!


कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर किशोर कदम यांनी साकारलेला ‘गोण्या’ लक्षात राहतो. अनुप बेलवलकर, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, शुभंकर तावडे यांनी आपापल्या भूमिका छान रंगवल्या आहेत. लहान मुलांची कामंही लक्षात राहतात.



दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी कोकणातील वातावरण, अंधार आणि उजेड यांचा मेळ छान साधला आहे. प्रल्हाद कुडतरकर यांची कथा आणि संवाद परिणामकारक ठरतात, तर संगीत आणि साऊंड डिझाइन देखील गोष्टीला पूरक वाटतं.


दशावताराचा केलेला प्रतीकात्मक वापर, कोकणी भाषेचे अधूनमधून ऐकू येणारे शब्द हे सगळं प्रेक्षकांना कोकणाच्या मुळाशी जोडतं.


एकूणच, ‘अंधार माया’ ही वेब सीरिज एक वेगळी आणि विचार करायला लावणारी अनुभव आहे. दुसरा सिझन यावा, अशी तुमच्याही मनात इच्छा राहील!

Comments
Add Comment

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला

राष्ट्रपती बघणार कांतारा चॅप्टर १ चित्रपट

नवी दिल्ली : बॉलीवूड सोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचीही लोकप्रियता वाढत आहे. जगभर दाक्षिणात्य चित्रपट

‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल