जागतिक पर्यावरण दिन भिवंडीत ८०० वृक्षारोपण

उद्यानांत कांचन, बहावा, जांभूळ, आंबा, बकुळसह रक्तचंदनाचीही लागवड


भिवंडी :पर्यावरणाच्या दृष्टीने शासन धोरणानुसार मान्सून काळात २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे धोरणानुसार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या उद्यान/वृक्षप्राधिकरण विभागामार्फत महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. १ कार्यक्षेत्रातील नव्याने विकसीत होणाऱ्या उद्यानांत मा. अति-आयुक्त विठ्ठल डाके यांच्या शुभहस्ते तसेच इमरान वली मोह खान, माजी उपमहापौर, भिवंडी मनपा उपआयुक्त बाळकृष्ण क्षिरसागर, सहायक आयुक्त शैलेश दोंदे, सहाय्यक आयुक्त, नितीन पाटील, सहाय्यक आयुक्त अजित महाडीक, सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र. १ मकसुम शेख, वसिम शेख, उपअभियंता, फैजल तातली, आरोग्य विभाग, श्रीकांत परदेशी, जनसंपर्क अधिकारी, भिवंडी मनपा व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, आगाज महिला बचत गटाच्या महिला व मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित वृक्षरोपणांचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत प्रभाग समिती क्र. १ कार्यक्षेत्रातील उद्यानांत कांचन, बहावा, जांभुळ, आंबा, बकुळ, रक्तचंदन इ. २०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.


तसेच मनपाच्या प्रभाग क्र. २ कार्यक्षेत्रातील भादवड स्मशानभूमी आवरात २०० बांबू वृक्षरोपांची लागवड करण्यात आली अाहे. प्रभाग समिती क्र. 3 कार्यक्षेत्रात वऱ्हाळा तलाव उद्यान परिसरामध्ये १००झाडांची वृक्षरोपण करण्यात आलेली आहे. तसेच प्रभाग समिती क्र. ४ कार्यालयासमोर उपलब्ध जागी १०० स्थानिक प्रजातीच्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आलेले आहे. मनपाच्या दिवानशहा दर्गा तलाव परिसरात २०० झाडे लावण्यात आली आहेत.अशा प्रकारे महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकुण- ८०० वृक्षरोपण करण्यात आले असून, त्यांचे जतन व संवर्धन करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मा. अति- आयुक्त विठ्ठल डाके यांनी कार्यक्रमस्थळी केले.

Comments
Add Comment

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील