पुण्यात चाललंय काय ? पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

  111

पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात हुंडाबळीच्या संशयावरुन हगवणे कुटुंबाची कसून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील कोरेगाव मूल परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात एका तरुणाने गळफास घेतला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. पत्नी मानसिक त्रास देत असल्याने पतीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर व्हिडीओ बनवून आपला त्रास कथन केल्याचे वृत्त आहे.


सूरज दामोदर पवार (वय ३२, रा. इनामदार वस्ती चिंतामणी हॉस्पिटल, जेधे चाळ, कोरेगावमूळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय ६०, व्यवसाय-शेती, रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याआधारे सूरजची पत्नी मयुरी सूरज पवार (वय २६) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.


काय प्रकरण आहे?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पवार आणि मयुरी जाधव यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते मूळचे कोरेगाव येथील इनामदार वस्तीत राहत होते. मात्र, बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे.


मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग


पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून सूरजने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हे चित्रीकरण त्यांनी मोबाईलमध्ये केले होते. पत्नी मयुरीकडून होणारा मानसिक छळ, मारामारी आणि मारहाणीमुळे सूरजने आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येला पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव हिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, बीएनएस कलम १०८, ११८ (१), ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यातील पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या