मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाईप गळतीमुळे वाहने घसरण्याचा धोका

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पोलादपूर शहरातून अंडरपास बॉक्सकटींग पद्धतीने भुमिगत झाला असून या महामार्गालगत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये अनेकदा गळती होऊन पाणी महामार्गाच्या काँक्रीटवर पसरल्याचे दिसून आले. भरपावसामध्ये अशा प्रकारची पाईपगळती सुरू होऊन शेवाळ निर्मिती होत राहिल्यास अंडरपास महामार्गामध्ये वाहने घसरण्याचा धोका निर्माण होणार असल्याने महामार्ग बांधकाम विभागाने तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.


राष्ट्रीय महामार्ग पोलादपूर शहरात मुंबईकडून शिरताना मूळ रस्त्यापासून खाली जात पोलादपूर एस.टी.स्थानकासमोर सुमारे ३२ फूट खोल अंडरपास जातो. चिखलीच्या डोहातील नळपाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसपासून संबंधित गावापर्यंत अंडरपास महामार्गाच्या बॉक्सकटींगच्या तळापासून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. उन्हाळयात या पाईपलाईनला दोनचार ठिकाणी गळती लागल्याने नळपणी योजनेचे पाणी महामार्गाच्या काँक्रीटरस्त्यावरून वाहात जाऊन गारवा निर्माण झाला होता. या गारव्यासोबतच पाणीगळतीमुळे संबंधित योजनांच्या गावांना पाणीपुरवठा मंद गतीने होऊ लागल्याने गळतीची दुरूस्ती करण्यात आली होती.


मात्र, पावसाळयातही या ठिकाणी गळती सुरू झाल्यास पाण्यासोबत शेवाळनिर्मिती होऊन काँक्रीटचा महामार्ग निसरडा होऊन वाहने घसरण्याचा धोका निर्माण होणार आहे. संबंधित नळपाणीपुरवठा योजनेच्या जलजीवन मिशनमार्फत अथवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या पाईपलाईन गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून वेळीच उपाययोजना न झाल्यास या काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याचा धोका उदभवणार आहे.

Comments
Add Comment

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व