One Plus 13S Launch: थोड्याच वेळात वन प्लस १३ एस लाँच होणार

प्रतिनिधी: आज वन प्लस १३ एस (One Plus 13S) भारतात लाँच होत आहे. या फोनची भारतात मोठी क्रेझ आहे. किंबहुना वन प्लसचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात देशात आहे. यापूर्वी कंपनीचे 13 व 13R भारतात येऊन गेले आहेत. या प्रोडक्ट लाईन मधील नवीन फिचर्ससह १३ एस भारतात दाखल होईल. आज सकाळी १२ वाजता हा फोन लाँच होणार आहे. वन प्लस कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.काही दिवसांपासूनच वन प्लसचा 'कॉम्पॅक्ट' फ्लॅगशिप फोन येणार यासाठी ग्राहकांची विशेष उत्सुकता होती. यावर्षी एकंदरच कॉम्पॅक्ट फोनचा ट्रेंड बाजारात येणार आहे. वन प्लस व्यतिरिक्त नवीन सॅमसंगचा एस २५ एज बाजारात आला आहे. ज्याची जाडी अक्षरशः ५.५ एमएमहून कमी आहे. याच धर्तीवर वन प्लस १३ एस देखील छोट्या आकाराचा असल्याने त्याची उपयुक्तता मोठी असू शकते. ते फोन सहजच आपल्या खिशात मावू शकतात.


फोनची जाहिरात सुरू झाल्यापासूनच फोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यामध्ये केवळ ६.३२ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. या फोनची जाडी ८.१५ एम एम असू शकते व वजन अंदाजे १८५ ग्रॅम असेल


या स्मार्टफोनमध्ये एक मोठा क्रायो-वेलोसिटी व्हेपर चेंबर असेल, कंपनीचा दावा आहे की हा त्यांच्या आतापर्यंतच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या चेंबरपैकी एक आहे. वनप्लसने असेही म्हटले आहे की स्मार्टफोनमध्ये वाढीव थर्मल व्यवस्थापनासाठी बॅक पॅनलमध्ये एक अद्वितीय कूलिंग लेयर समाविष्ट केला जाईल. लाँच होण्यापूर्वी, वन प्लस (One Plus) ने स्मार्टफोनच्या अनेक प्रमुख स्पेसिफिकेशन तपशीलांची पुष्टी केली आहे. वन प्लस १३s मध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट असेल.


कॅमेरा स्पेसिफिकेशन्ससाठी, कंपनीने पुष्टी केली आहे की १३s स्मार्टफोनमध्ये सेल्फी, व्हिडिओ कॉल आणि बरेच काहीसाठी समोर ऑटो फोकस (AF) सह ३२ MP सेन्सर असेल. मागील कॅमेरा स्पेसिफिकेशन्स अद्याप उघड झालेले नाहीत.लिकस्टरचा टिप्सनुसार या फोनची किंमत ५५००० रुपयांच्या आसपास असू शकते.या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेटभोवती बांधले आहे, जे एक ३nm प्रोसेसर आहे जे उत्कृष्ट कार्यक्षमता आणि कामगिरी वाढीचे आश्वासन देते.


OnePlus 13s: अपेक्षित फिचर्स


डिस्प्ले: ६.३२ इंच OLED, FullHD+


रिझोल्यूशन, १२०Hz LTPO रिफ्रेश रेट, १६०० nits HDR ब्राइटनेस, HDR10+, डॉल्बी व्हिजन


प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट


रॅम: १६GB पर्यंत (LPDDR5x)


स्टोरेज: १ TB पर्यंत (UFS ४.०)


मागील कॅमेरा: ५०MP प्रायमरी (ऑटोफोकस, OIS) + ५०MP टेलिफोटो (OIS)


फ्रंट कॅमेरा: ३२MP (ऑटो फोकस)


बॅटरी: ६२६०mAh


चार्जिंग: ८०W वायर्ड

Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतासाठी २०२५ वर्ष सर्वात उष्ण ठरणार?

नवी दिल्ली : जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

राज्यात भीक मागणे हा गंभीर गुन्हा होणार

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५