आता इगतपुरी ते कसारा अवघ्या आठ मिनिटांत

इगतपुरी : समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या आठ मिनिटांत गाठता येणार आहे.


नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या आठ मिनिटात गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गावरील ७६ किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण पाच बोगदे आहेत.मात्र सर्वाधिक लांबीचा आठ किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो. राज्यातील सर्वाधिक लांबीचा हा बोगदा आहे. काय आहेत या बोगद्याची वैशिष्ट्ये चला जाणून घेऊयात...




बोगद्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे


- साडेसतरा मीटर रुंदी आणि नऊ मीटर उंचीचा हा बोगदा असून याला एकूण तीन लेन आहेत. ताशी शंभर किलोमीटरच्या वेगाने येथून प्रवास करता येणार आहे.


- प्रत्येक तीनशे मीटर अंतरावर एक असे एकूण २६ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहे. एखादा अपघात घडला तर जवळच्या क्रॉस पॅसेजमधून बाहेर पडता येईल.


- बोगद्यातील भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन देतानाच भिंतींना लाईट रिफ्लेकटींग लावण्यात आले आहे, ज्यामुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट दिसतो.


- शंभर डबल एक्सल रिव्हसेबल व्हेंटिलेशन फॅन बसविण्यात आले आहेत. यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यास आणि गाड्यांचा धूर बाहेर निघण्यास मदत होणार आहे.


- प्रत्येक ९० मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे, एखाद्या वाहनाला आग लागली आणि बोगद्यातील तापमान ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाली तर अटोमॅटिक स्प्रिंकल सुरू होतात, देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. डेन्मार्कहून हे तंत्रज्ञान मागविण्यात आले आहे.२४ मीटरचा एक झोन आहे, असे एका टनेलमध्ये २८६ आणि दोन्ही बोगदे मिळून ५७२ झोन तयार करण्यात आले आहेत.



अखेर प्रतीक्षा संपली


राज्यातल्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ५२० किलोमीटर टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला आणि वाहतूक सेवेत आला यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या ८० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर ४ मार्च २०२४ रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या २५ किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व टप्प्यांमुळे मार्च २०२४ पासून नागपूर ते इगतपुरी या ६२५ किलोमीटरच्या प्रवासात लक्षणीय गती मिळाली. मात्र नागपूर ते मुंबई थेट आठ तासांत प्रवास केव्हा शक्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यासाठी इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर टप्प्याचे वाहतूक सेवेत समावेश होणे अत्यावश्यक होते. अखेर प्रवाशांची ही प्रतीक्षा संपली असून, गुरुवार ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणानंतर काही तासांतच हा टप्पा वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड