लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारजवळ दुर्घटना घडली. राजेश ढिला असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो ट्रेनमधून प्लॅटफॉर्मऐवजी दुसऱ्या बाजूला उतरण्याचा प्रयत्न करत होता.


याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशने ट्रेनमधून चुकीच्या बाजूला उडी मारली. त्या बाजूला लोखंडी सळ्यांच्या बॅरिकेड्सवर अडकला. त्याच्या गळ्यात लोखंडी सळई घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला होता. काही मिनिटं तो तसाच लटकलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.


सव्वा दहाच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्याला नेण्यात आले. मात्र घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचा मृतदेह नायर रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सोपवला जाईल.

Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१