स्तुती: जीवन संगीत

  47

सद्गुरू वामनराव पै


आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही तर काही नाही ही वस्तुस्थिती आहे. तो दिसत नसला तरी सर्व चाललेले आहे ते त्याच्यामुळे चाललेले आहे. विद्युत ऊर्जा दिसत नसली तरी सर्व चाललेले आहे ते विद्युत शक्तीमुळेच, ती नाही तर सर्व बंद. विद्युत शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा परमेश्वर अनंत पटीने मोठा आहे. इतका तो मोठा असून सुद्धा माझ्यामुळे जग चाललेले आहे असे तो कधीच म्हणत नाही. ज्ञानेश्वरीत सुंदर सांगितलेले आहे,



“आकाशे सर्वत्र वसावे वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहन करावे ही आज्ञा माझी’’


आकाशाने सर्वत्र वसावे. वायूने कधीही थांबू नये, वाहत राहावे. अग्नीने दहन करावे, पृथ्वीने भूमात्रांना धरून ठेवावे ही त्याची आज्ञा आहे. आज्ञा माझी म्हणजे काय? सत्ता माझी. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, सत्ता म्हणजे असणे. सत्य, सातत्य असणे म्हणजे सत्. ही सत्ता म्हणजे त्याच्या केवळ अस्तित्वामुळे हे सर्व चाललेले आहे. त्याच्या सत्तेने सर्व चाललेले असते पण तो कधीच कुणाला येऊन सांगत नाही की हे मी केले तुम्ही त्याला काहीही केले तरी तो तुमच्या स्तुतीला भाळत नाही. स्तोत्र म्हटले की तो खूश ही तुमची कल्पना आहे. लोक स्तोत्र म्हणतात कारण त्यांना देव प्रसन्न होईल असे वाटते. ते खरे नाही, कारण असा देव प्रसन्न होत नाही. खरेतर तुम्ही देवाची प्रार्थना करता, विश्वप्रार्थना म्हणता, स्तोत्र म्हणता म्हणजे काय करता? देव म्हणजे काय? हे माहीत नसेल तर त्या स्तोत्राला काहीच अर्थ नाही. देव म्हणजे काय हे आधी कळले पाहिजे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे.’’ आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाची ओळख नाही, देवाला कधी पाहिलेले नाही. स्तोत्र म्हणणे चांगलेच, ते वाईट नाही. स्तोत्र म्हणत असताना देवाबद्दल काही माहीत नसेल तर त्या स्तुतीला अर्थ काय? खरा देव कसा आहे हे समजून ते केले पाहिजे. खोटी स्तुती व खरी स्तुती यात फरक आहे. एखादा खरेच चांगले गाणे म्हणत असताना त्याची स्तुती केली तर ती खरी स्तुती पण केवळ त्याला बरे वाटावे म्हणून स्तुती करतो ती खोटी स्तुती. खरी स्तुती व खोटी स्तुती यांत फरक काय? देवाची ओळख झाल्यावर देवाची स्तुती करतो तेव्हा ती देवाला जास्त आवडते. देवाची स्तुती का करायची? देव असा आहे की त्याची स्तुती किती करावी? त्याचे कौतुक किती करावे? त्याच्याबद्दल किती बोलावे? याला काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात देव हा आहेच तसा हे मला सांगायचे आहे.


 
Comments
Add Comment

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या

ब्रह्मर्षी भृगू

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी महर्षींणा भृगुरहं गिरामस्येकमक्षरम्। गीता अ.१०,२५ भगवद्