Weather Update: राज्यात हवामानाची गती मंदावली, काही ठिकाणी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व हवामानाची गती मंदावली असून, राज्यात पावसाचा जोर १० ते १२ जूनदरम्यान कमी-अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता असून सध्या मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झालेला आहे.


हवामान विभागाने केवळ हलक्या सरींचा अंदाज वर्तवला असतानाही मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच रिमझिम सरी सुरू होत्या, मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला. मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईत जोरदार पावसामुळे सकाळीच काही भागांत पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.


दुसरीकडे, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत आकाश ढगाळ राहण्याची चिन्हं आहेत.


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांत सध्या फारसा पाऊस नाही. काही ठिकाणी ऊन-पावसाचा लपंडाव दिसून येतो आहे. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनची दाबरेषा अद्याप स्पष्टपणे तयार झालेली नसल्यामुळे ही स्थिती "मान्सून खंड" नाही, परंतु मान्सूनची गती निश्चितच मंदावली आहे. त्यांनी १२ ते १४ जूननंतर पावसात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही दिला आहे.


दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असून, आर्द्रता ७० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहे. परिणामी उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे आणि नागरिकांना येत्या काही दिवसांतही अशाच वातावरणाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम