सुधाकर बडगुजरांची उद्धव सेनेतून हकालपट्टी

नाशिक : नाशिक शहर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपाक ठेवून सुधाकर बडगुजर यांच्यावर कावाई करण्यात आली आहे. बडगुजर लवकरच महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये उद्धव सेनेचे अनेकजण पक्षावर नाराज आहेत, असे संकेत दिले होते. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, असे सूतोवाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यामुळे महापालिका निवडणुकीआधी नाशिकमध्ये उद्धव गटाला धक्का बसणार अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.


उद्धव सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकर परिषदेला नाशिकचे उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख असूनही सुधाकर बडगुजर गैरहजर होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याचे बडगुजरांनी कळवले होते. पण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या सुमारास मुंबईतून फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे कळवण्यात आले. यानंतर ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली.


कोण आहेत सुधाकर बडगुजर ?


पक्षातून हकालपट्टी होण्याआधी सुधाकर बडगुजर उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख होते. ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे जवळचे म्हणून ओळखले जात होते. राजकारणातली कारकिर्द २००७ पासून सुरू करणाऱ्या बडगुजरांनी अल्पावधीत प्रगती केली होती. ते २००९ ते २०१२ या काळात नाशिक महापालिकेचे सभागृह नेते होते. तसेच २०१२ ते २०१५ दरम्यान बडगुजर नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. ते तब्बल १५ वर्ष नाशिक महापालिकेचे नगरसेवक होते.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे!

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे