प्रहार    

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांसाठी खुला

  75

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांसाठी खुला

पुणे : अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.आता गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होत आले असून उद्या, गुरुवार (दि.५) पासून सिंहगड किल्ला खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली.


याबाबत प्रांताधिकारी यशंवत माने म्हणाले, 'पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा येऊ नये, म्हणून गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. आता सर्व काम झाले आहे. पाडण्यात आलेला राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश देण्यात येणार आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.'


सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण व दरडी हटविण्याचे काम करताना रस्ता मोकळा मिळावा, तसेच कोणत्याही पर्यटकांना इजा होऊ नये, यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार