SBI News: आता व्हा मालामाल लखपती एसबीआयची सर्वसामान्यांसाठी ' हर घर लखपती योजना '

प्रतिनिधी: स्टेट बँक ऑफ इंडियाने ' हर घर लखपती ' नावाची योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. यामध्ये कमीत कमी रकमेवर जास्तीत जास्त परतावा (Return) सर्वसामान्य जनतेला शक्य होऊ शकते. प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम भरल्यास ठराविक काळानंतर चांगला परतावा मिळणार आहे. यावेळी बँकेने व्याजदरात ०.२० टक्क्याने कपात केली आहे.


गुंतवणूकदार १ लाख किंवा त्याहूनही अधिक गुंतवणूक करू शकतात. ३ ते १० वर्षांची मुदत या योजनेसाठी असणार आहे. जर पाच लाखांपर्यंत रक्कम असल्यास मात्र लवकर रक्कम काढल्यास ०.५० % दंडही बसू शकतो. त्याहून अधिक गुंतवणूक असल्यास व वेळेपूर्वी काढल्यास १% दंड बसू शकतो. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बँकेने मुद्दल (Principal) अधिकाधिक भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. मात्र जर वेळेत मुद्दल न भरल्यास मात्र दंड होऊ शकतो.


ही रक्कम आयकर मोजणीसाठी दखलपात्र असणार आहे.


काय आहे व्याजदर ?


सर्वसामान्य नागरिक -


३ वर्ष - ६.५५%, ४ वर्ष - ६.५५%, ५ वर्ष - ६.३० %, ६ वर्ष - ६.३०%, ७ वर्ष -६.३०%, ८ वर्ष - ६.३०%, ९ वर्ष -६.३०%, १० वर्ष - ६.३०%


ज्येष्ठ नागरिक - ३ वर्ष - ७.०५%, ४ वर्ष - ७.०५%, ५ वर्ष - ६.८०%, ६ वर्ष - ६.८०%, ७ वर्ष - ६.८०%, ८ वर्ष - ६.८०%, ९ वर्ष - ६.८०%, १० वर्ष - ६.८०%


जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज ४०००० रूपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ५०,००० रूपये), तर तुम्हाला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न या रकमेपेक्षा जास्त असेल तर १०% टीडीएस कापला जाईल.


पात्रता - या योजनेसाठी १० वर्ष किंवा त्याहून अधिक पाल्य पात्र असेल.


खाते कसे उघडावे?


या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क करा अथवा भेट द्या. या योजनेसाठी सर्व ती आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने