महाराष्ट्र पोस्टलकडून इंडिया पोस्ट : एक्स्पो सिम्पोजियमचे आयोजन

  27

निर्यातदारांशी संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल


मुंबई : आंतरराष्ट्रीय पोस्टल (डाक) लॉजिस्टिक्स वाढविण्यासाठी आणि निर्यातदारांशी संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने मंगळवारी मुंबईतील मॅरियटच्या अझूर फेअरफील्ड येथे इंडिया पोस्ट : एक्स्पो सिम्पोजियमचे आयोजन केले.


जागतिक ई-कॉमर्स आणि सीमापार व्यापाराच्या वाढीसह, विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एसएमई) या संगोष्ठीने आंतरराष्ट्रीय निर्यात आणि लॉजिस्टिक्स इकोसिस्टममधील प्रमुख भागधारकांना एकत्र आणून सहयोगी वाढीच्या संधींचा शोध घेतला.


संवाद आणि नवोन्मेषासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे भारतीय डाक विभागाला मोठ्या प्रमाणात निर्यातदारांशी थेट संपर्क साधता आला आणि ईएमएस (स्पीड पोस्ट सर्व्हिस), इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट आणि इंटरनॅशनल बिझनेस पार्सल यासह त्यांच्या अत्याधुनिक जागतिक वितरण सेवा प्रदर्शित करता आल्या. यावेळी अमिताभ सिंह मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल; आर के मिश्रा, परराष्ट्र व्यापार महासंचालनालय; सुश्री केया अरोरा, संचालक डाक सेवा, मुंबई क्षेत्र, सुश्री सिमरन कौर, संचालक डाक सेवा (मुख्यालय) मुंबई आणि अभिजीत इचके, संचालक डाक सेवा, नवी मुंबई क्षेत्र या मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


या कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी जागतिक बाजारपेठेत नेव्हिगेट (संचार) करणाऱ्या भारतीय व्यवसायांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि सुलभ निर्यात लॉजिस्टिक्स भागीदार बनण्याच्या संस्थेच्या ध्येयावर भर दिला. ते पुढे म्हणाले, भारतीय डाक विभाग आधुनिक निर्यातदारांच्या गरजांनुसार टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. एक्स्पो सिम्पोजियम आंतरराष्ट्रीय व्यापार लॉजिस्टिक्समधील अंतर भरून काढण्यासाठी आणि एसएमई क्षेत्राला सक्षम करण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.

Comments
Add Comment

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील प्रक्रिया

Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय

हुश्श! इराणकडून युद्धविरामाची घोषणा

तेहरान: इस्रायल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली