जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात बसवणार कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन

राज्याच्या पर्यावरण विभागाद्वारे मंत्रालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक


मुंबई: दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2025) साजरा केला जातो. सध्या वाढत्या प्लास्टीकच्या वापरामुळे होत असलेले प्रदूषण लक्षात घेता, प्लास्टीक बंद करण्याच्या हेतूने सरकारने पाऊले उचलली आहेत. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने बुधवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सिंगल यूज प्लास्टिक मोहिमेला गती देण्यासाठी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखली आहे.


या मोहिमेचा भाग म्हणून मंत्रालयातील सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिक वस्तू एकत्र करून जमा करण्यास सांगण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्याचा पर्यावरण विभाग दररोज मंत्रालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक म्हणून गुरुवारी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्याचे आदेश


मंगळवारी एक आदेश जारी करून सर्व विभागांना मंत्रालयातील त्रिमूर्ती येथील त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यास सांगितलंय. खरं तर केंद्रातील मोदी सरकारने 2018 ला देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू मिळणे बंद झाले होते. या बंदीमध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश होता. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्या वस्तूंची यादी जाहीर केली होती, ज्यावर बंदी घालण्यात आलीय.



सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय?


सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार