पाकिस्तान सीमेवर IAF ड्रिलसाठी हवाई हद्द राखीव; बंदी २३ जूनपर्यंत वाढवली, NOTAM जारी, तुर्की कंपनीवर बंदी

नवी दिल्ली : भारताने ४ जून २०२५ रोजी पाकिस्तानच्या दक्षिण सीमेच्या जवळ भारतीय वायुदलाच्या (IAF) सरावासाठी हवाई हद्द राखून ठेवली असून, यासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आला आहे. हा एकदिवसीय लष्करी ड्रिल असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


दरम्यान, पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतीय हवाई हद्द वापरण्यावर असलेली बंदी २३ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी नुकतेच स्पष्ट केले.


ही बंदी पाकिस्तान नोंदणीकृत विमान, तसेच त्यांच्याकडून चालवलेली, मालकी असलेली किंवा भाड्याने घेतलेली प्रवासी आणि लष्करी विमानं यांना लागू आहे. मागील काही सुरक्षेच्या घटनांमुळे भारताने हा निर्णय कायम ठेवला आहे.



इंडिगो विमानाला वळण नाकारलं, वाद वाढला


२१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E 2142) ला पठाणकोट परिसरात वादळी हवामान आणि गारपिटीचा सामना करावा लागला. विमानाने दिशा बदलून आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने वळण घेण्याचा प्रयत्न केला, पण वायुदलाच्या नॉर्दर्न कंट्रोलने परवानगी नाकारली. नंतर लॉर एटीसीकडेही पाकिस्तानी हद्दीत प्रवेशाची विनंती करण्यात आली, पण तिथेही नकार मिळाला.



तुर्कीची 'सेलेबी' कंपनीवर सुरक्षा कारणास्तव बंदी


दुसऱ्या एका मोठ्या निर्णयात, तुर्कीची 'Celebi Airport Services' या ग्राउंड हँडलिंग कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. मंत्री नायडू म्हणाले की, "राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून विमानतळांवरील कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही."


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७० टक्के ग्राउंड सेवा ही 'सेलेबी'च सांभाळत होती. प्रवासी हाताळणी, माल वाहतूक, पोस्टल सेवा, गोदाम व्यवस्थापन, एअरब्रिज सेवा यासाठी ही कंपनी जबाबदार होती.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,