एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ 

  75

१ कोटींचा अपघाती विमा; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिने मोफत प्रवास 


मुंबई (प्रतिनिधी) : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ, १ कोटी रुपयांचा अपघाती विमा तसेच ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित केलेल्या एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विविध कर्मचारी संघटनांचे नेते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांना पूर्वी मूळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता जून २०२५ पासून त्यामध्ये भर पडणार असून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सेवेतील ७८ हजार कर्मचाऱ्यांना हा लाभ होईल. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचा अपघाती विमा दिला जाईल.


अपघात झाल्यास विमा कवच लागू: एसटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, बसगाड्यासह बसस्थानके, स्वच्छतागृह व विश्रन कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर दिला पाहिजे. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजेत. एसटी तोट्यातून कर कशी काढता येईल. याचा अभ्यास करावा. एसटीकडे बघण्याया दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.


परिवहन महामंडळातील कर्मचान्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्याऱ्यांना कामगिरीवर असताना-नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास १ कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयापर्यंत विमा रक्कम दिली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही